पायाभुत सुविधा

पुणे-पौड मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे. तसेच काही रस्ते कॉक्रीटचे केले आहेत. व वस्त्यांचा जोडण्यासाठी खडी व मुरुमाचे रस्ते तयार केले आहे. गावातील सांडपाण्याची व्यवस्था योग्य रीतीने व्हावी यासाठी गटारे व बंद गटारे बांधलेली आहे. गावामध्ये मुळशी प्रदेशीक पाणी पुरवठा योजना राबविलेली आहे. तसेच यशवंत ग्रामसमृध्दी योजने अंतर्गत पाण्याच्या टांक्या बांधलेल्या आहेत. त्याव्दारे गावात पाणी पुरवठा केला जातो. तसेच गावामध्ये घरोघरी स्वच्छागृह आहेत. व काही ठिकाणी सार्वजनिक स्वच्छागृह आहेत. त्याप्रमाणे गावामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. व मुळशी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., बाणेर नागरी सहकारी पतसंस्था या सारख्या आर्थिक पेढा उपलब्ध आहेत. दळणवळणाच्या सोयीसाठी गावापर्यंत एस.टी., बस. सेवा, खाजगी वाहतुकीची सोय आहे. शहरापासून गाव जवळ असल्यामुळे बाजाराची गरज भासत नाही.